Tuesday 27 October 2015

सेंद्रिय पद्धतीचे उटणे - कृति व माहिती

सेंद्रिय उटणे - कृति व माहिती

खालील घटक सम प्रमाणात एकत्र करावेत. प्रत्येकी 50 ग्रॅम

1. पपई पावडर
2. कोरफड पावडर
3. गुलाब पावडर
4. संत्री साल पावडर
5. तुलसी पावडर
6. मुलतानी माती
7.कचुर सुगंधी
8. नागर मोथा
9. आंबे हळद पावडर
10. लाईम ( लिम्बू पावडर ).

वरील गोष्टी खालील ठिकाणी मिळू शकतील.

अंबर फार्मा केम
1478 , शुक्रवार पेठ, जिलब्या मारुती जवळ,
शनिपार मंडई रस्ता, पुणे 2
फोन : 02024459173
02024457871


  • हे अश्या प्रकारचे उटणे 100% सेंद्रिय असल्या मुळे,त्याचा वापर वर्षभर करता येईल....
  • आपल्या दैनंदिन जीवनात जो chemical रहित साबणाचा वापर करून आपण स्वतः च्या आरोग्यास व पर्यावर्णास हानि पोचवत आहोत,ती ह्या उटण्याच्या नियमित वापरा मुळे संपवता येईल.
  • तसेच हयात वापरले जाणारे घटक पदार्थ उदा: संत्रा पावडर,गुलाब पावडर ,पपई पावडर ह्या गोष्टी घरी सुद्धा बनवता येऊ शकतात.
  • ह्या पाण्याने तुम्ही अंघोळ केलित व् ते पाणी collect केले , किंवा बाथरूम चा ड्रेनेज पाईप बागेत सोडलात तर ते पाणी झाडांना ही चालेल
  • आपल्या ग्रुप मधल्या श्री संजय आठवले यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. 




BY
Mrs.Vaibhavi Rahalkar

        

Friday 23 October 2015

BEST OUT OF WASTE.....

बागकामाची सुरुवात करताना येणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक महत्वाची म्हणजे झाडे लावण्यासाठी सोईस्कर आणि स्वस्त अशी कोणती उपयुक्त साधने वापरावीत.


मी माझी गच्चीवरील सेंद्रिय बाग सुरु केली तेव्हा मला एक उत्तम उपाय सापडला. घरामध्ये किंवा बाहेर मिळणारी टाकाऊ,भंगारात गेलेली बादल्या,टब, बाटल्या,रंगाचे डबे इत्यादी साधने. हे सर्व अत्यंत कमी खर्चिक असल्यामुळे त्याला 'स्वस्त आणि मस्त' असेच म्हणायला पाहिजे.
याचा वापर करण्याचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत ;:-


१. यापैकी काही तर घरातच सापडू शकते व त्या मुळे खर्च एकदम शून्य होतो आणि बाहेरून विकत आणले तरी फारच कमी खर्चिक पडते.भंगाराची गाडी किंवा दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.

२. त्याला आधीपासूनच जागोजागी भोके असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपले नंतरचे काम वाचते.







आपण पाण्याच्या १ किंवा २ लिटर च्या बाटल्यांचा वापर विविध प्रकारे पण करू शकतो. ह्या घरी तर असतातच पण आपण होटेल मध्ये पाण्याची बाटली मागविली कि ती नंतर तिथेच ठेवून येतो त्या पेक्षा घरी आणून त्याचा आपल्या बागेत फार सुंदर उपयोग होतो. याचे ‘hangings’ पण छान दिसतात.


                                           




बाटल्या वापरताना खालील विचार आवश्यक आहे :-
१. बाटल्या झाडे लावण्यासाठी वरून कापताना खाली सुद्धा पाणी झिरपण्या साठी भोके पाडणे आवश्यक असते. जर चुकून भोके थोडी मोठी झाली तर त्यावर विटांचे छोटे तुकडे ठेवावेत.
२.झाडाच्या स्वरूपावरून ते बाटलीत उभे लावावे का आडवे ते ठरवावे. उदा. चीनी गुलाब,office time हे आडवे पसरतात त्यामुळे ते आडव्या बाटलीत लावावे मात्र money plant उभे आणि खाली वाढतात त्यामुळे उभ्या बाटलीत लावावी. अशा प्रकारे जे झाड लावू त्याची वाढ उत्तम होते.
आपण वाफ्यात नाहीतर कुंडीत झाड लावताना जे मातीचे मिश्रण वापरतो तेच या सर्व साधनांमध्ये वापरावे. परंतु मी इथे विशेष उल्लेख करू इच्छिते कि मातीविना शेती सुद्धा अत्यंत उत्तम प्रकारे होते.माझा बागेत हा मी प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी झाली असे वाटते.
वरील साधनांचा वापर म्हणजे आपण आपल्या बागेत केलेला 'BEST OUT OF WASTE' चा उत्तम प्रयोग आहे. सध्या घन् कचरा ही जी सार्वजनिक समस्या झाली आहे त्या सोडविण्यासाठी हा आपला खारीचा वाटा समजू यात.     








  





BY
Neela Panchpor
neela2808@yahoo.com





Thursday 22 October 2015

City Home Composting..... the simplest way of Kitchen Waste Composting

City Home Composting

        This is the simplest and the cheapest way of Kitchen Waste Composting for the city dweller
                                                                 
                                                          
                               The composting bag 



The fresh contents of the bag



The End Product ( sugarcane in the process of getting composted)

                              




My primary purpose of composting –  I started composting mainly for managing the wet waste from the kitchen which many times constitutes more than 80% by volume of the total daily household  garbage. While doing this, I never wanted  to increase work for the people at home. ( Otherwise, soon people will lose interest in the activity.)

The Achievement – The daily garbage from my home has dropped to about 10% by volume of the earlier garbage.

The Modus Operandi of  home composting
1) Purchase a nylon bag of suitable size.   (See picture above. You get it in all sizes , shapes and colors. For ease of operation, I use 1.5’ X 1.5’ X 8”)
2) Put  5 to 6 folded newspaper pages at the bottom of the bag. This prevents dripping of the liquid ( compost tea) from the bottom and also aids in absorbing extra moisture , creating excellent condition for composting.
3) Start adding all compost- able material. I do not add any extra compost powder to this. If anyone wants to add, it is not a problem.
4) I do not take any extra , special efforts to chop , shred the vegetable waste. Otherwise it will become time and labor intensive, and soon people at home will lose interest in the activity. Just a word of caution, This activity must be taken as whole family activity and not one person’s dream. However ,if someone has time and inclination , chopping and shredding will definitely hasten the process.
In about a month’s time , usable material starts forming ( though the composting process is still on.) For a family of 4 , the above size bag takes about 6 months to fill.



Precautions to be taken –
1)Do not keep this bag in the sun. It ll start tearing apart due to the UV of the sunlight.
2) Do not add extra water ( unless it is totally dry.) This ll start dripping and attract the flies and start smelling.
3) For the first few days ( till the material has fungal growth), do not add any smelly food( fish waste or non-veg). Once the process has set in , these materials can be added  in the middle of the heap and covering from the top as well.
4) The zipper must be always locked. In case,  you ever find any maggots, larvae in the compost heap , do not panic. Flies will be formed in few days and will fly away , when you open zipper.
5) It is advisable to put some dry material like dry leaves or saw dust etc every alternate day on the heap to ensure aerobic conditions. 
6) The composting process may attract rodents  and hence it is advisable to keep it away from their reach.  

Why is it successful – 1) The nylon bag is porous from all sides ensuring aerobic conditions and hence there is no smell. ( Please believe me.)
2) It prevents compacting of the compost just by shaking the bag ( which is lot easier than digging through.)
3) It has zipper at the top , so no flies, insects in search of food can reach the leftover contents.

My secondary purpose of composting – To generate ready soil mix for new plants. For this , I occasionally bring bag-full  waste ( like banana peels, cauliflower leaves etc) from the vegetable market and start composting in an independent bag. Normally , I have 2 or 3 composting bags in operation at any moment.


P.S. – In case of rodent menace, I follow a closed bucket kitchen waste composting.

In case you are planning to start, please feel free to contact me at 




BY
Aniruddha Deshpande



Monday 12 October 2015

Useful Information on : Butterflies from Papilionidae Family

Butterflies from Papilionidae Family

आज जगभरात जवळजवळ २०,००० प्रकारची फुलपाखरे आहेत ...त्यापैकी भारतात एकूण १,४०० आणि महाराष्ट्रात १७० प्रकारची फुलपाखरे आढळतात . त्यामध्ये फुलपाखरांची जी एक मोठी family आहे , ' Papilionidae ' , यामध्ये मोडणा-या फुलपाखरांना swallowtail butterflies म्हणतात . ज्यामधे Common Rose , Common Mormon , Blue Mormon यासारखी फुलपाखरे येतात .त्यापैकी एक सुंदर फुलपाखरू Common Mormon याची आपण माहिती घेऊया .

फुलपाखरांच आयुष्य हे एकूण ४ अवस्थांच्या जीवनचक्रामधे विभागलं जातं .
१) अंड २) अळी ३) कोष आणि ४) फुलपाखरू .

कॉमन मॉरमॉनची मादी लिंबूवर्गीय झाडं म्हणजे कागदी लिंबू , संत्रं , मोसंबं आणि कढीपत्ता यांसारख्या झाडांच्या पानांवर अंडी घालते . एका पानावर एकच अंडं याप्रमाणे ती एकावेळी साधारण २५ ते ३० अंडी घालते . साधारण ३ ते ५ दिवसांनी त्या अंड्यातून एक छोटीशी अळी बाहेर पडते . त्यावेळी तिचा आकार अर्धा सेंटिमीटर पेक्षाही कमी असतो . जन्मानंतर थोड्याच वेळात ती त्या झाडाची पानं खायला सुरूवात करते .
या अवस्थेत फक्त अधाशासारखी पाने खाणे एवढेच काम तिला असते . या झाडांच्या पानांमधे अळीच्या वाढीसाठी पोषकतत्वे असतात , म्हणूनच अशाच प्रकारच्या झाडांवर फूलपाखरू अंडी घालते . म्हणजे जन्माला आल्या आल्या लगेचच अळीला पोषकतत्वाने भरपूर पाने खायला मिळतात . पानं खात खात अळी मोठी होते . जवळजवळ ४ ,५ सें मी एवढी लांब आणि करंगळीएवढा आकार झाला की त्या अळीचा सुरुवातचा रंग बदलतो . आधी काळपट करड्या रंगाची आणि साधारण पक्ष्याच्या विष्ठेसारखी दिसणारी अळी आता अतिशय आकर्षक गडद पोपटी रंग धारण करते . अशावेळी ती पानावर बसलेली आपल्याला कळत पण नाही . पण पक्ष्यांचं मात्र या अळ्यांकडे बारीक लक्ष असतं . या अळ्या पोषकतत्वाने भरपूर असल्यामुळे पक्षी आपल्या पिल्लांच्या भरणपोषणासाठी अशाच अन्नाच्या शोधात असतात . म्हणूनच तर फुलपाखराने एकावेळी २५ , ३० अंडी घातली असली तरी अळीच्या अवस्थेत असताना त्यांची शिकार होण्याचे प्रमाण फार मोठे आहे . प्रत्यक्षात सगळ्या अवस्था पार करून आकाशात भरारी घेणारी फुलपाखरं २५ पैकी ४, ५ एवढयाच प्रमाणात असतात . असो.
तर अशी पानं खाऊन मोठी झालेली अळी एक दिवस झाडाच्या फांदीवर चिकटून एक कोष तयार करते . तिच्या जन्मापासून साधारणपणे १८ ते २० दिवसांनी असा कोष तयार होतो . आधी अधाशासारखी पानं खाणारी अळी कोषाच्या अवस्थेत गेल्यावर एकदम निद्रिस्तावस्थेत असल्यासारखी फांदीवर चिकटलेली असते . यावेळी ती निद्रिस्तावस्थेत किंवा सुप्तावस्थेत असते असा एक गैरसमज आहे . तसं अजिबात नसतं . उलट याच अवस्थेत तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होत असतात . या अळीचं फुलपाखरात रूपांतर होण्याची महत्त्वाची प्रक्रिया याच अवस्थेत तर घडत असते .
कोषाच्या अवस्थेत साधारणपणे १० दिवस राहिल्यानंतर एके दिवशी हा कोष फोडून सुंदरसं फुलपाखरू बाहेर पडतं . सूर्योदयापासून ते सकाळचे ७ , ८ वाजेपर्यंत केव्हातरी हा सोहळा चालू होतो . कोषातून बाहेर पडायला फुलपाखराला अतिशय कष्ट घ्यावे लागतात , खूप धडपड करावी लागते . पूर्णपणे बाहेर पडायला त्याला १५ ते २० मिनिटे लागतात . बाहेर पडल्यावर त्याचे पंख गुंडाळलेल्या अवस्थेत असतात , हळूहळू हालचाल करून त्यांची गुंडाळी ते सोडवतं . असे पंख जरासे ओलसर असतात , याचे कारण म्हणजे कोषावस्थेत असताना कोषाच्चा आत एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो जो रूपांतरणाच्या काळात त्याचे पोषण करत असतो . असे नुकतेच उलगडलेले पंख छान गडद रंगाचे आणि आकर्षक दिसतात . बाहेर आल्यावर थोडा वेळ ते आहे तिथेच बसून असतं , लगेच उडत नाही . हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातं . मग शेजारच्या झाडावर जातं आणि मग दूर जातं . कोषातून बाहेर पडून मोकळ्या हवेत भरारी घ्यायला त्याला ४० मिनिटांपासून एक दीड तासाचा कालावधी लागू शकतो .
आपल्याकडे लिंबूवर्गीय काही झाडे असतील , आणि त्यावर फुलपाखरू येऊन बसतंय असं दिसलं , तर आपण नीट निरीक्षण केल्यास फुलपाखराचा हा जन्मसोहळा आपणही अनुभवू शकतो . एक अलौकिक अनुभूती आपणही अनुभवू शकतो .     










BY Anuradha Dushi

कीड नियंत्रण कसे करावे ..... Tips & Techniques


कीड नियंत्रण कसे करावे ह्या साठी काही TIPS 


1. किडिंना अंधार आवडतो. Moisture आवडते. Aeriation वाढले की किड येत नाही.

2. कीड़ी एवढ्या हुशार असतात की त्यांच्या third generation ला कळलेले असते की आपली मागची पीढ़ी कुठल्या केमिकल मुळे मेलि त्या प्रमाणे त्या स्वतः ला adapt करतात.

3. हेअर ड्रायर चा तुम्ही कीड़ी काढण्यासाठी वापर करू शकता. कीड़ी suck करायच्या.

4. Pruning and cutting : एका फांदिला किड लागली तर ती काढून लांब फेकून देणे किंवा जाळणे.

5. पिक बदल करणे आवश्यक आहे. suppose तुम्ही आत्ता मेथी लावली तर ती काढल्यानंतर परत मेथी न लावता शेपू वगैरे लावणे

6. प्रत्येक किडिला एक विषिष्ठ आवड़ असते , ती ओळखुन त्या प्रमाणे उपाय योजना करणे.

7. Trap crop लावा : मका, मोहोरी, फ्रेंच बिन्स हे चांगले trap crops आहेत.

8. मिलीबग , पिठ्या ढेकुण नुसता काढून चालणार नाही. कारण मुंग्या नकळत त्यांची अंडी वाहून नेऊन ठेवतात. त्या साठी आधी मुंग्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.

9. fertile, सुपिक माती कशी ओळखायची, तर मातीच्या वासा वरून. जेंव्हा पहिला पाऊस पडतो तसा वास येयला पाहिजे.

10. पाणी जास्त झाले की ऑक्सीजन च प्रमाण कमी होऊन नायट्रोजन चे प्रमाण वाढते. नायट्रोजन चे प्रमाण वाढले की झाडांची पाने हिरवी लुसलुषित होतात, व् किडिंना ते खाणे एकदम सोपे जाते. त्यामुळे प्रमाणात पाणी घालणे आवश्यक आहे.

11.Affids मावा 2 प्रकारचे असतात, काळा आणि हिरवा

12. सोप solution हे बेस्ट solution for affids मावा.

13. Organic pest solution - रीठा , शिकेकई

14. बुरशी साठी pottasisum permangnate 1000 ml ,ला 10 ml

15. Red mites , normally दिसतच नाही. पाने सुरुकुतलेली दिसतात. lens घेऊन बघितली तरच किड दिसते. normally गुलाबाच्या पानावर , खालच्या बाजूला असते. त्याला उपाय रॉकेल किंवा रिठयाचे पाणी मारणे.

16. सोप मारण्याचा उद्देश् spread होणे व stick होणे.

17. कीड़ी normally सूर्यास्ता नंतर व् सूर्योदया आधी active असतात. त्या मुळे तेंव्हा कीटकनाशक मारणे चांगले.

18. Liquid soap चांगला. सर्फ किंवा निरमा जास्त spread होत नाही.

19. तेल्या रोगा मुळे डाळीबाचि वाट लागली . तेल्या चे जंतु composting मधे 70 डिग्री temperature ला ही active असल्याचे आढळून आले.

20. नाग अळी, मेथी व काकड़ी वर्गीय वर जास्त attack करतात. त्यावर चांगला उपाय म्हणजे राख टाकणे.

21.हळद regularly मातीत टाकत चला.

22. Copper sulphate, मोरचुद स्प्रे करा.

23. अतिशय आंबट ताक स्प्रे करणे हा एक उपाय आहे.

24.प्रत्येक झाडाला ताक घालायचे नाहीये. काही झाडांना acidic soil लागते. त्यांनाच ताक घालायचे आहे. पोयटा माती acidic असते.

25. गोगल गाय slugs किंवा snails हे दोन प्रकार असतात. शंख असलेली व नसलेली. Hand picking हा सर्वात चांगला उपाय. किंवा कोकिळा , भारद्वाज पाळा, ते आवडिने खातात.

26. गोगल गाइना काय आवडत नाही तर कोरडेपणा. त्यामुळे भुस्सा टाका किंवा मिठाचे पाणी टाका.

27. मिलिपिड, किंवा पैसा ह्याला किड म्हणणे चुकीचे आहे. तो उपयोगी असतो.

28.Insects get attracted to normally yellow and blue colours. त्यामुळे ह्या रंगांचे सापळे करा.

29. हुमणि - ह्याचा main source पूर्ण कम्पोस्ट न झालेले शेणखत हा आहे. ह्या साठी एरंड पेंड मातीत मिक्स करावी.

30. एक उपाय - सीताफळाच्या बियांची पूड करून स्प्रे करणे. त्यात cynide सायनाइड असते.

31.निम् oil महिन्यातून एकदा तरी स्प्रे करणे आवश्यक आहे.किड नसेल तरी.

32. धुरी देणे हा एक चांगला उपाय आहे. बाळंत शेपा किंवा वेखंड , वावडिंग ची धुरी देयची. 



Sunday 4 October 2015

गच्चीमधील माती विना शेती ..... A Soil-less Terrace Garden

गच्चीमधील माती विना शेती 

  • सुमारे अठरा वर्षापूर्वी आमच्या बंगल्याच्या भोवती जमिनीवर सुंदर बाग होती . पण बंगल्याचे वाढीव बांधकाम करण्याचे ठरविल्यावर आमची बाग आम्ही गच्चीत करण्याचे ठरविले व त्यासाठी गच्चीचे water proofing  करून घेतले. 
  • गचीवर मातीचे वजन होऊ नये म्हणून मतीविना शेतीचा प्रयोग करण्याचे ठ रविले.त्यासाठी  गांडूळ खताचा पर्याय निवडला ,त्यामुळे आमच्या बिल्डिंग मधील सर्वांच्या घरात तयार होणारा ओला कचराही घरातच जीरणार होता व बागेतील पाला पाचोळा हि त्यासाठी वापरता येणार होता . इनोरा कडून गांडुळे आणून प्रकल्प चालू केला आणि आमची गच्चीतील बाग आकार घेऊ लागलि. 



  • अनेक प्रकारची फुलझाडे ,त्यात देशी गुलाब,orchids , विविध रंगी शेवंती ,जास्वंद मोगरे जुई,रानजाई  नेवाळी असे अनेक प्रकार आहेत.  
 



  • भाज्यांमध्ये दुधी भोपळा ,लाल भोपळा , दोडके ,वांगी टोम्याटो , लाल मुले , मिरच्या , पालक अंबाडी शेवगा अळू अश्या अनेक प्रकारच्या भाज्या आहेत . 






  • बागेमध्ये पपई सीताफळ लिंबू पेरू डाळिंब चिक्कू केळी  अशी फळझाडे आहेत  
                             



  • आमचा सर्वात वेगळा प्रयोग म्हणजे नारळाच्या कोयेर वरील lawn !!!!!
  • टाकाऊ तून टिकाऊचा प्रयोग.  कोयेरवर lawn असल्याने ते गुंडाळून  ठिकाणाहून दुसरीकडे न्हेता येते. 





  • बागेमध्ये गांडूळ खताबरोबर कोकोपीट स्टेरामिल निमपेंड व जीवामृत चा वापर केल्याने बाग सदैव बहरलेली असते . सेंद्रिय पद्धतीनेच सर्व करण्याचा आमचा कटाक्ष असतो . 






सुचित्रा दिवाण 
 शिरीष दिवाण 
suchitradiwan@gmail.com