Saturday, 5 March 2016

घन जीवामृत... By Neela Panchpor

सेंद्रिय शेती/ बागकाम करणाऱ्यांसाठी जीवामृत हे वरदानच आहे. झाडांसाठी ते उत्तम पारंपारिक सेंद्रिय खत समजले जाते. 
यामध्ये द्रव जीवामृत आणि घन जीवामृत असे दोन प्रकार आहेत.


या दोन्ही मधील महत्त्वाचा फरक म्हणजे टिकाऊपणा.
द्रव जीवामृत हे तयार केल्यापासून चवथ्या दिवशी वापरले तर त्याचा संर्वोत्तम फायदा होतो, त्यानंतर त्याचे गुणधर्म कमी होत जातात. या तुलनेने घनजीवामृत सहा महिन्यापर्यंत छान टिकते.

घनजीवामृत तयार करण्याची पद्धत खालील प्रमाणे :-
देशी गाईचे शेण       10 kgs.
देशी गाईचे गोमूत्र    500 ml.
डाळीचे पीठ           200 gms.
नैसर्गिक गूळ।         200 gms.
मूठभर माती

 हे सर्व एकत्र करून घ्यावे. त्याच्या गोवऱ्या नाहीतर ढीग करून सावलीत वाळवून पोत्यात भरून ठेवावे.
कुंडीत झाडांना घालताना अंदाजे मूठभर असे मातीच्या वरच्या थरात मिसळून घालावे. घालताना मातीत ओलावा असणे हितकारक आहे.
घनजीवामृत मधील पोषक द्रव्यांचा हवेशी सम्पर्क आला तर ते गुणधर्म कमी होऊ नयेत म्हणून घातल्यानन्तर त्यावर mulching करणे फायद्याचे ठरते.

Step 1

Step2


Step 3

Step 4Article By
Neela Panchpor
3 comments:

 1. It's very useful information Thanks

  ReplyDelete
 2. अतिशय सुरेख माहिती, निला मॅडम.

  ReplyDelete
 3. खूप महत्त्वाचं. कारण द्रव जिवामृताचे आयुष्य पाच दिवसाचे. बनलेले सगळे वापरणे कित्येक वेळा शक्य होत नाही.त्यासाठी हा घन पर्याय उत्तम.
  मीही असे केक बनवत असे. पण त्यात निंबोनी पेंड 1/2 किलो टाकत होतो. बेसन आणि गुळाचे फिजिकल स्वरूप बदलून किटाणूना थारा मिळत नाही.

  ReplyDelete