Thursday, 30 June 2016

Composting....A simple method

कम्पोस्टिंग 


कम्पोस्टिंग म्हणजे विघटन करून  (decompose ) वेगळ्या पदार्थात रूपांतर करणे .कम्पोस्टिंग म्हणजे सोप्या भाषेत ओल्या कचऱ्या पासून माती तयार करणे . त्यात घरच्या घरी भाजीपाला व फुलझाडे लावू शकतो किंवा कोणालाही खत म्हणून देऊ शकतो .
आमचा केटरिंग चा business आहे, त्यामुळे ओला कचरा खुप मोठ्या प्रमाणावर तयार होतो. ओला कचरा 2 प्रकारचा असतो ,
 १. भाज्यांची व फळांची  साले, देठे,बिया , टरफले इत्यादी . 
२. खर्कटे ज्यात उरलेले शिजवलेले अन्न , पानात टाकलेले पदार्थ इत्यादी
ह्या दोन्ही प्रकारच्या कचऱ्याला वेग वेगळी ट्रीटमेंट देणे आवश्यक असते कारण शिजवलेल्या अन्नात पाण्याचा अंश जास्त असतो . त्याला वास येण्याची शक्यता असते .

आम्ही जी पद्धत वापरतो ती aerobic पद्धत आहे , म्हणजे ज्यात हवा खेळणे आवश्यक आहे . दुसरी एक पद्धत आहे की ज्यात कचरा पूर्ण झाकून ठेवावा लागतो म्हणजे डबा बंदच ठेवायचा . म्हणजे लोकांना एक भीती असते की कचरा म्हणजे घाण घरात कस ठेवायचे अशी . ही पद्धत फ्लॅट साठी जास्त उपयुक्त आहे . त्यात  कार्बन डाय ऑक्साईड मधे वाढणाऱ्या जंतूंची वाढ केली जाते . आपल्या ग्रुप वरचे अनिरुद्ध देशपांडे याची माहिती देऊ शकतील . त्यासाठी त्यांनी विशिष्ट कल्चर ही विकसित केले आहे .

पहिल्या प्रकारचा कचरा जिरवायला जास्त काही त्रास पडत नाही ,वास नाही. फार मेहनत ही करावी लागत नाही . जर तुमच्याकडे जमीन असेल तर फारच सोपे काम आहे .दोन मोठे खड्डे खणावेत .  किती खोल, रुंद इत्यादी तुमच्याकडे असणारी जागा व कचऱ्याचा आकारमान ह्यावर अवलंबून आहे . त्यात रोज हा कचरा टाकून त्यावर थोडी माती टाकून देणे . खड्डा भरल्यानंतर साधारण एक महिन्याने त्यात पूर्ण खत तयार झाले असेल . त्या खड्ड्यावर रोज थोडे पाणी शिंपडणे आवश्यक आहे . पावसाळ्यात गरज नाही . पहिला खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात ह्याच प्रकारे कचरा घालणे .

जर जमीन नसेल , गच्चीत कुंडीत अथवा वाफ्यात कचरा जिरवयचा असेल तर  -
कुंडीत अथवा वाफ्यात नारळाच्या शेंड्या खाली घालाव्यात . कुंडी ला खाली व आजु बाजूला भोंके असणे आवश्यक आहे जेणेकरुन हवा खेळेल व् खालून कंपोस्ट टी बाहेर पडू शकेल. त्यावर मातीचा किंवा लाकडाच्या भुश्श्या चा थर द्यावा . ह्याचे कारण कम्पोस्ट मधून येणारा रस (कम्पोस्ट टी ) ह्यात मुरतो बाहेर येत नाही  नाहीतर कुंडी तिकाटण्यावर ठेऊन खाली एक पातेले ,ट्रे ठेवावा की ज्यात कंपोस्ट टी जमेल .रोज तो झाडांना घालून टाकावा . ह्यात खूप कस असतो . ह्याचा कीटक नाशक म्हणून ही उपयोग करता येतो . कम्पोस्ट टी मधे पाणी मिक्स करून फवारणी करावी .
ह्या कुंडीवर झाकण ठेवण्याची गरज नाही .

खरकटं अशाच पद्धतीने जिरवता येईल पण त्याच्या कुंडीवर झाकण ठेवणे आवश्यक आहे , शिवाय त्यावर वजन ठेवणे ही आवश्यक आहे . अशासाठी की उंदीर ,घुशी येऊ नयेत .
घरगुती खर्कटे खूप कमी प्रमाणात असते .त्यामुळे त्यासाठी खरं तर वेगळी पद्धत करण्याची गरज नाही . १ नंबर व २ नंबर कचरा एकत्र करूनही जिरवता येईल .

पण आमच्या कडे हॉल मधील ५०-१०० लोकांच्या जेवणाचा खर्कट्याचा कचरा असल्यामुळे आम्हाला तो वेगळा जिरवावा लागतो .
खर्कट्याच्या कचऱ्यात पाणी खूप प्रमाणात असल्यामुळे तो थोडा कोरडा करण्याची आवश्यकता असते .त्यामुळे त्यात सम प्रमाणात लाकडाचा भुस्सा ,वाळलेला पाला पाचोळा ,नारळाच्या शेंड्या घालाव्यात . आम्ही तो कम्पोस्टर मधे कल्चर  घालून रोज फिरवतो . फिरवल्यामुळे तो ओला ,कोरडा कचरा चांगल्या पद्धतीने एकत्र होतो , व त्यातील जास्त पाण्याचा अंश शोषला जातो .  कम्पोस्टर म्हणजे एक सिंटेक्स ची टाकी आहे की ज्याला हॅन्डल्स बसवलेली आहेत . कौस्तुभ याद्रे यांनी विकसित केलेला आहे .

कौस्तुभ याद्रे  यांचा फोन नंबर : ९६ ०४ ०४ ६९ ८३

जर कम्पोस्ट ला वास येत असेल तर कम्पोस्टिंग व्यवस्थित होत नाही असे समजावे . वास येत असल्यास कोरडेपणा वाढवावा म्हणजे भुस्सा जास्त घालावा .

अनिरुद्ध देशपांडे यांनी कम्पोस्टिंग साठी दिलेला एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे ATM म्हणजेच  Air,Temperature, Moisture.
म्हणजे कम्पोस्ट मधे हवा खेळणे आवश्यक आहे, त्यामुळे कचरा वर खाली करावा लागतो. पण 1 नंबर च्या कचऱ्या मधे असे करणे आवश्यक नाही. तुमचे खर्कटे घरगुती असल्यामुळे अगदी कमी प्रमाणात असणार ,त्यामुळे अस वेगळे करण्याची गरज नाही.
वर खाली केले नाही तरी चालते ,फक्त कम्पोस्टिंग व्हायला दिवस जास्त लागतात,बाकि काही नाही.

Temperature - योग्य ताप मान राखणे आवश्यक आहे. खुप थंड असेल तर कम्पोस्टिंग होत नाही.

Moisture : पाणी जास्त झाल्यास कम्पोस्टिंग होत नाही. फक्त ओलावा पाहिजे , पाणी साठायला नको.
सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतः कंपोस्टिंग ला छोट्या प्रमाणात का होईना सुरुवात करावी . बरेच लोक असे आहेत की जे नुसत्या शंकाच विचारत बसतात पण कधीही सुरुवात करत नाहीत . तुम्ही जोवर सुरुवात करणार नाही तोवर तुम्हाला चुका समजणार नाहीत .

BY
Amod Rahalkar

8 comments:

 1. अमोद सर, अतिशय सोप्या भाषेत समजावलेत. छान!

  ReplyDelete
 2. खरंच झाडांसाठी ते अगदी सोनेच आहे.

  ReplyDelete
 3. शिजलेले अन्न कम्पोस्टमध्ये जास्त असेल तर 10 किलो शिजलेल्या अन्नासाठी 300 ग्राम wood ash(लाकडी कोळशाची राख घालणे महत्वाचे आहे, कारण तेलकट पणा हा कम्पोस्ट क्रिया लांबवतो असा अनुभव आहे.

  ReplyDelete
 4. Khup chan mahiti.. Mi pan atach composting chalu kele. kachara number 1 che. Pan khuo chilte hotat. Ghatta zakan lavave ka?

  ReplyDelete
 5. I started composting in clay pot (mataka). In that I can see many Caterpillar like insect, what is it? is it good or bad?shall I throw all stuff.pl guide

  ReplyDelete
  Replies
  1. All insects, microbs, are good. Don't throw them.

   Delete
 6. खरच छान लेख लिहिला मला माहित नाही तरीही असाच प्रयोग करून पाहिला अन उत्तम खत तयार केले म्हणजे मी बरोबर आहे

  ReplyDelete
 7. मी बागेतल्या पालापाचोळा चे आणि घरातल्या ओल्या कचऱ्याचे वेगळे कंपोस्टिंग करते. दोन्ही छान होते. माझ्या बागेला पुरेसे होते आणि बाग पण मस्त होते. गेले 2 वर्षे एकदाही ओला कचरा बाहेर नाही टाकला

  ReplyDelete