Sunday, 4 October 2015

गच्चीमधील माती विना शेती ..... A Soil-less Terrace Garden

गच्चीमधील माती विना शेती 

 • सुमारे अठरा वर्षापूर्वी आमच्या बंगल्याच्या भोवती जमिनीवर सुंदर बाग होती . पण बंगल्याचे वाढीव बांधकाम करण्याचे ठरविल्यावर आमची बाग आम्ही गच्चीत करण्याचे ठरविले व त्यासाठी गच्चीचे water proofing  करून घेतले. 
 • गचीवर मातीचे वजन होऊ नये म्हणून मतीविना शेतीचा प्रयोग करण्याचे ठ रविले.त्यासाठी  गांडूळ खताचा पर्याय निवडला ,त्यामुळे आमच्या बिल्डिंग मधील सर्वांच्या घरात तयार होणारा ओला कचराही घरातच जीरणार होता व बागेतील पाला पाचोळा हि त्यासाठी वापरता येणार होता . इनोरा कडून गांडुळे आणून प्रकल्प चालू केला आणि आमची गच्चीतील बाग आकार घेऊ लागलि.  • अनेक प्रकारची फुलझाडे ,त्यात देशी गुलाब,orchids , विविध रंगी शेवंती ,जास्वंद मोगरे जुई,रानजाई  नेवाळी असे अनेक प्रकार आहेत.  
  • भाज्यांमध्ये दुधी भोपळा ,लाल भोपळा , दोडके ,वांगी टोम्याटो , लाल मुले , मिरच्या , पालक अंबाडी शेवगा अळू अश्या अनेक प्रकारच्या भाज्या आहेत . 


 • बागेमध्ये पपई सीताफळ लिंबू पेरू डाळिंब चिक्कू केळी  अशी फळझाडे आहेत  
                              • आमचा सर्वात वेगळा प्रयोग म्हणजे नारळाच्या कोयेर वरील lawn !!!!!
 • टाकाऊ तून टिकाऊचा प्रयोग.  कोयेरवर lawn असल्याने ते गुंडाळून  ठिकाणाहून दुसरीकडे न्हेता येते. 

 • बागेमध्ये गांडूळ खताबरोबर कोकोपीट स्टेरामिल निमपेंड व जीवामृत चा वापर केल्याने बाग सदैव बहरलेली असते . सेंद्रिय पद्धतीनेच सर्व करण्याचा आमचा कटाक्ष असतो . 


सुचित्रा दिवाण 
 शिरीष दिवाण 
suchitradiwan@gmail.com1 comment:

 1. मला आपल्या गटात सामील करा.मला देखील खुप इच्छा आहे माझे प्रयत्न चालु आहेत पण अपेक्षित यश मिळालेले नाही

  ReplyDelete