Tuesday, 17 November 2015

गच्चीवरील भातशेती .....By Suresh Bapat

गच्चीवर भात लावण्याचा प्रयोग एकदम अनपेक्षितपणे झाला.    • २०१० साली मी भाज्या लावण्यासाठी १६ फुटX१२ फुट चौकोन तयार करून त्यात वाफे तयार केले. एक दोन दिवसात अचानक जोरदार पाऊस पडला आणि तो चौकोन पाण्याने पूर्ण भरून गेला. खाली शेततळ्यात वापरतात तसे UV plastic sheet असल्याने तेथे पाणी साचून राहिले. ते बघितल्यावर ह्या मधे तांदुळ लावून बघावा असा विचार मनात आला. आमच्या कड़े असलेल्या ऑपरेटरची भात शेती असल्याने त्याला फोन केला व ही कल्पना सांगितली. तेव्हा ६इंच जाडीच्या मातीच्या थरावर व गच्चीत, भात येणे शक्य नाही असे म्हणून तो हसायलाच लागला. पण तरीही त्याच्या कडून थोड़ी रोपे मागवली व त्या चिखलात लावूनही टाकली.
  • १५-२० दिवसांनी ती रोपे छान उभी राहिलेली पाहून मला खुप छान वाटले. हळूहळू त्या रोपांची वाढ होत होती. ६ इंच जाडी च्या चौकोनात फक्त कचरया पासून बनलेली माती होती व ती त्या रोपांचे संवर्धन करत होती. इंच इंच वाढणारया रोपाना बघुन उत्साह वाढत होता.आता त्याला लोंब्या कधी येतात याची मी व माझी पत्नी वाट पहात होतो. रोज सकाळी चहा पिताना ह्या रोपाच्या हिरव्या गार दर्शनाने आमचा दिनक्रम सुरु व्हायचा. 

  • साधारण 2 महिन्यानी लोंब्या धरायला सुरवात झाली, तेव्हा हा प्रयोग नक्की यशस्वी होणार याची खात्रीच पटली. रोपे लावल्या पासून अडीच महिन्यात तो पूर्ण चौकोन लोंब्यानी भरून गेला. आता भाताचा सुमधुर सुवास येऊ लागला. त्या वासाने मन तृप्त होऊन जायचे. तसेच ह्या रोपांजवळ मुनियासारखे  छोटे छोटे पक्षी घिरटया घालू लागले. दाणे टीपण्यासाठी त्यांचीचाललेली धडपड , लगबग मोठी मजेशीर दिसायची.
  • ज्या ऑपरेटर ने रोपे दिली, तो ही भात आलेला पाहून थक्क झाला. सकाळ व Indian Express ह्या वर्तमानपत्रांनी हा एक वेगळा प्रयोग म्हणून बातमी दिली. ६इंच जाडीच्या थरावर व कमी पाण्यावर भात येऊ शकतो व जेथे शक्य आहे तेथे वर्षातून दोन वेळा ही येऊ शकतो हे सिद्ध झाले. २-३ बाहेरगावचे शेतकरी मुद्दाम येऊन बघुन गेले. त्यांनी हा प्रयोग स्वतः सुरु केला. मग दर वर्षी हा भात लावण्याचा प्रयोग सुरूच आहे. दर वर्षी साधारण १०-१२ किलो भात होतो. तो पाहून व खाउन छान वाटते.

स्वकष्टर्जित पिकलेल्या तांदूळा चा भात खाताना लागणारी त्याची चव ! मजा काही औरच !

                माझ्या बागेतील इतर भाजीपाला , फुलझाडे व फळसंपदा 
BY 
Suresh Bapat 

8 comments:

  1. Amazing Mr.Bapat, if you need a mulch of leaves the call Hrishikesh on 9371094877, just keep the good work.

    ReplyDelete
  2. मला तर जादूच वाटते आहे...तुमच्या कष्टांना निसर्गाने केलेला हा सलाम आहे...भाताच्या रोपांना भरपूर उन्हं लागते का?

    ReplyDelete