Friday, 23 October 2015

BEST OUT OF WASTE.....

बागकामाची सुरुवात करताना येणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक महत्वाची म्हणजे झाडे लावण्यासाठी सोईस्कर आणि स्वस्त अशी कोणती उपयुक्त साधने वापरावीत.


मी माझी गच्चीवरील सेंद्रिय बाग सुरु केली तेव्हा मला एक उत्तम उपाय सापडला. घरामध्ये किंवा बाहेर मिळणारी टाकाऊ,भंगारात गेलेली बादल्या,टब, बाटल्या,रंगाचे डबे इत्यादी साधने. हे सर्व अत्यंत कमी खर्चिक असल्यामुळे त्याला 'स्वस्त आणि मस्त' असेच म्हणायला पाहिजे.
याचा वापर करण्याचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत ;:-


१. यापैकी काही तर घरातच सापडू शकते व त्या मुळे खर्च एकदम शून्य होतो आणि बाहेरून विकत आणले तरी फारच कमी खर्चिक पडते.भंगाराची गाडी किंवा दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.

२. त्याला आधीपासूनच जागोजागी भोके असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपले नंतरचे काम वाचते.







आपण पाण्याच्या १ किंवा २ लिटर च्या बाटल्यांचा वापर विविध प्रकारे पण करू शकतो. ह्या घरी तर असतातच पण आपण होटेल मध्ये पाण्याची बाटली मागविली कि ती नंतर तिथेच ठेवून येतो त्या पेक्षा घरी आणून त्याचा आपल्या बागेत फार सुंदर उपयोग होतो. याचे ‘hangings’ पण छान दिसतात.


                                           




बाटल्या वापरताना खालील विचार आवश्यक आहे :-
१. बाटल्या झाडे लावण्यासाठी वरून कापताना खाली सुद्धा पाणी झिरपण्या साठी भोके पाडणे आवश्यक असते. जर चुकून भोके थोडी मोठी झाली तर त्यावर विटांचे छोटे तुकडे ठेवावेत.
२.झाडाच्या स्वरूपावरून ते बाटलीत उभे लावावे का आडवे ते ठरवावे. उदा. चीनी गुलाब,office time हे आडवे पसरतात त्यामुळे ते आडव्या बाटलीत लावावे मात्र money plant उभे आणि खाली वाढतात त्यामुळे उभ्या बाटलीत लावावी. अशा प्रकारे जे झाड लावू त्याची वाढ उत्तम होते.
आपण वाफ्यात नाहीतर कुंडीत झाड लावताना जे मातीचे मिश्रण वापरतो तेच या सर्व साधनांमध्ये वापरावे. परंतु मी इथे विशेष उल्लेख करू इच्छिते कि मातीविना शेती सुद्धा अत्यंत उत्तम प्रकारे होते.माझा बागेत हा मी प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी झाली असे वाटते.
वरील साधनांचा वापर म्हणजे आपण आपल्या बागेत केलेला 'BEST OUT OF WASTE' चा उत्तम प्रयोग आहे. सध्या घन् कचरा ही जी सार्वजनिक समस्या झाली आहे त्या सोडविण्यासाठी हा आपला खारीचा वाटा समजू यात.     








  





BY
Neela Panchpor
neela2808@yahoo.com





No comments:

Post a Comment