कीड नियंत्रण कसे करावे ह्या साठी काही TIPS
1. किडिंना अंधार आवडतो. Moisture आवडते. Aeriation वाढले की किड येत नाही.
2. कीड़ी एवढ्या हुशार असतात की त्यांच्या third generation ला कळलेले असते की आपली मागची पीढ़ी कुठल्या केमिकल मुळे मेलि त्या प्रमाणे त्या स्वतः ला adapt करतात.
3. हेअर ड्रायर चा तुम्ही कीड़ी काढण्यासाठी वापर करू शकता. कीड़ी suck करायच्या.
4. Pruning and cutting : एका फांदिला किड लागली तर ती काढून लांब फेकून देणे किंवा जाळणे.
5. पिक बदल करणे आवश्यक आहे. suppose तुम्ही आत्ता मेथी लावली तर ती काढल्यानंतर परत मेथी न लावता शेपू वगैरे लावणे
6. प्रत्येक किडिला एक विषिष्ठ आवड़ असते , ती ओळखुन त्या प्रमाणे उपाय योजना करणे.
7. Trap crop लावा : मका, मोहोरी, फ्रेंच बिन्स हे चांगले trap crops आहेत.
8. मिलीबग , पिठ्या ढेकुण नुसता काढून चालणार नाही. कारण मुंग्या नकळत त्यांची अंडी वाहून नेऊन ठेवतात. त्या साठी आधी मुंग्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.
9. fertile, सुपिक माती कशी ओळखायची, तर मातीच्या वासा वरून. जेंव्हा पहिला पाऊस पडतो तसा वास येयला पाहिजे.
10. पाणी जास्त झाले की ऑक्सीजन च प्रमाण कमी होऊन नायट्रोजन चे प्रमाण वाढते. नायट्रोजन चे प्रमाण वाढले की झाडांची पाने हिरवी लुसलुषित होतात, व् किडिंना ते खाणे एकदम सोपे जाते. त्यामुळे प्रमाणात पाणी घालणे आवश्यक आहे.
11.Affids मावा 2 प्रकारचे असतात, काळा आणि हिरवा
12. सोप solution हे बेस्ट solution for affids मावा.
13. Organic pest solution - रीठा , शिकेकई
14. बुरशी साठी pottasisum permangnate 1000 ml ,ला 10 ml
15. Red mites , normally दिसतच नाही. पाने सुरुकुतलेली दिसतात. lens घेऊन बघितली तरच किड दिसते. normally गुलाबाच्या पानावर , खालच्या बाजूला असते. त्याला उपाय रॉकेल किंवा रिठयाचे पाणी मारणे.
16. सोप मारण्याचा उद्देश् spread होणे व stick होणे.
17. कीड़ी normally सूर्यास्ता नंतर व् सूर्योदया आधी active असतात. त्या मुळे तेंव्हा कीटकनाशक मारणे चांगले.
18. Liquid soap चांगला. सर्फ किंवा निरमा जास्त spread होत नाही.
19. तेल्या रोगा मुळे डाळीबाचि वाट लागली . तेल्या चे जंतु composting मधे 70 डिग्री temperature ला ही active असल्याचे आढळून आले.
20. नाग अळी, मेथी व काकड़ी वर्गीय वर जास्त attack करतात. त्यावर चांगला उपाय म्हणजे राख टाकणे.
21.हळद regularly मातीत टाकत चला.
22. Copper sulphate, मोरचुद स्प्रे करा.
23. अतिशय आंबट ताक स्प्रे करणे हा एक उपाय आहे.
24.प्रत्येक झाडाला ताक घालायचे नाहीये. काही झाडांना acidic soil लागते. त्यांनाच ताक घालायचे आहे. पोयटा माती acidic असते.
25. गोगल गाय slugs किंवा snails हे दोन प्रकार असतात. शंख असलेली व नसलेली. Hand picking हा सर्वात चांगला उपाय. किंवा कोकिळा , भारद्वाज पाळा, ते आवडिने खातात.
26. गोगल गाइना काय आवडत नाही तर कोरडेपणा. त्यामुळे भुस्सा टाका किंवा मिठाचे पाणी टाका.
27. मिलिपिड, किंवा पैसा ह्याला किड म्हणणे चुकीचे आहे. तो उपयोगी असतो.
28.Insects get attracted to normally yellow and blue colours. त्यामुळे ह्या रंगांचे सापळे करा.
29. हुमणि - ह्याचा main source पूर्ण कम्पोस्ट न झालेले शेणखत हा आहे. ह्या साठी एरंड पेंड मातीत मिक्स करावी.
30. एक उपाय - सीताफळाच्या बियांची पूड करून स्प्रे करणे. त्यात cynide सायनाइड असते.
31.निम् oil महिन्यातून एकदा तरी स्प्रे करणे आवश्यक आहे.किड नसेल तरी.
32. धुरी देणे हा एक चांगला उपाय आहे. बाळंत शेपा किंवा वेखंड , वावडिंग ची धुरी देयची.
No comments:
Post a Comment